सम्राट अशोक राज्यस्तरीय परीक्षा

सम्राट अशोक राज्यस्तरीय परीक्षा

अखंड भारताची निर्मिती करणारा पहिला सम्राट. संघराज्य शासन प्रणाली स्थापन करून कुशल प्रशासन करणारा सम्राट. साम्राज्यासाठी केंद्रीय कृषी निधी ठरविणारा, कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून, तळे, कालवे, विहिरी, यांच्या निर्मितीवर व उच्च प्रतीचे बियाणे विकसित करण्यावर, भर देणारा सम्राट. २४०० वर्षापूर्वीची इजिप्त वगैरे देशांसोबत समुद्रामार्गे व्यापार करणारा सम्राट.

कोणताही भेदभाव न करता साम्राज्यात सर्व पंथाच्या लोकांना समानतेने वागवणारा सम्राट. प्रजेच्या भौतिक सुखासोबतच त्यांच्या नैतिक उत्कर्षाचा विचार करणारा आणि धम्म महामात्रा या विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून, त्याला कृतीची जोड देणारा, जगाच्या इतिहासातील एकमेव सम्राट.

मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणारा, औषधी व इतर उपयुक्त वनस्पती, तसेच शिकारीस बंदी घालून, जंगलांचे संवर्धन करणारा, जगातला पहिला पर्यावरणवादी सम्राट. साम्राज्यात मनुष्याबरोबरच जनावरांसाठी ही चिकित्सालय, पाण्याची सोय करून प्राणीमात्रांचा ही प्रजेप्रमाणे सांभाळ करणारा सम्राट. हजार स्तुपांची निर्मिती करून, बुद्धांचा धम्म जगाच्या पाठीवर नेणारा सम्राट. लेणी, शिलालेख, स्तंभलेख याची भारताला सर्वप्रथम ओळख करून देणारा सम्राट अशोक.

भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. भारताचा इतिहास वैभव संपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ता आल्या. या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं. यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे, मौर्य साम्राज्य.

 

चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. यांना महान अशोक किंवा “अशोक द ग्रेट” असेही संबोधले जाते.

सम्राट अशोक माहिती मराठी Samrat Ashok Information In Marathi

पूर्ण नाव सम्राट अशोक
जन्म तारीख ३०४ इ.स.पू.
जन्म स्थळ पाटलीपुत्र
ओळख सम्राट , महान राजा
आईचे नाव शुभद्रांगी
वडिलांचे नाव दुसार
आजोबा चंद्रगुप्त मौर्य
पत्नीचे नाव देवी, करुवाकी, पद्मावती, तिष्यरक्षिता
मृत्यू २३२ इ.स

कोण होता सम्राट अशोक ?

चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर, त्याचा मुलगा बिंदुसार राजा झाला. बिंदुसार हे महान सम्राट अशोकाचे वडील होते. बिंदुसार राजाने आपल्या राज्याचा विस्तार केला. तो राजा असताना चाणक्य त्याचा प्रधानमंत्री होता. बिंदुसार राजा असताना तक्षशिलाच्या लोकांनी दोन वेळा बंड केले. परंतु, ते बंद त्याचा पुत्र अशोक यांनी तक्षशिलेचा राज्यपाल म्हणून, काम पाहत असताना यशस्वीरित्या मोडून काढले.

 

 

 इसवी सन पूर्व २७२ च्या सुमारास बिंदुसार यांचे निधन झाले. बिंदुसार यांना थोर वडिलांचा मुलगा, थोर मुलाचे वडील या नावाने ओळखतात . कारण, ते प्रसिद्ध राज्यकर्ते चंद्रगुप्त मौर्यांचे पुत्र, महान राजा अशोकाचे वडील होते. बिंदुसार यांच्या नंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक गादीवर बसला.

त्यांनी कलिंगावर स्वारी केली. कलिंग हे ठिकाण आजच्या ओडीसा राज्यात आहे. त्याने कलिंगावर विजय मिळवला. प्राचीन भारताच्या परंपरेत, चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले, अशाच महान सम्राटाना दिली जाते.

 

सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात. चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये अगदी शीर्ष स्थानावर आहेत. सम्राट अशोकाने मगध साम्राज्याचा विस्तार वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून, दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेत सौराष्ट्रापर्यंत केला. असा हा सम्राट अशोक शूर, पराक्रमी, राजा होता.

 

सम्राट अशोक यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन

भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे, महाराजे झाले. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, असे लोककल्याण करी राजे खूप दुर्मिळ आहे. सम्राट अशोक हा राजा भारतात नव्हे, तर जगातील एक लोककल्याणकारी आणि सुप्रसिद्ध राजा म्हणून नावाजला.

चक्रवर्ती अशोक देश-विदेशातील अनेक अभ्यासकांच्या विषयावर, अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. चक्रवर्ती अशोकचा कालखंड इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. सुमारे इसवीसन पूर्व ३३३ चा त्यांचा जन्म आहे. तरी इसवीसन पूर्व २३२ ला त्यांचा महापरिनिर्वाण झालं. सुमारे सत्तर वर्षाचा आयुष्य सम्राट अशोकाना लाभलं.

 

 

चक्रवर्ती अशोक मौर्य घराण्यातील राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि राजा बिंदुसार यांचा मुलगा होता. चंद्रगुप्त मौर्य यांनी पाटलीपुत्र म्हणजे आताच पाटना या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा पाया घातला. त्या मौर्य साम्राज्याचा तिसऱ्या पिढीतील, प्रभावशाली वारसदार म्हणजे सम्राट अशोक.

चक्रवर्ती अशोक यांना खूप मोठ्या संघर्ष करावा लागला आणि संघर्षातून ते राजपदापर्यंत पोहोचले. आपल्या वडिलांच्या काळामध्ये, म्हणजे राजा बिंदूसरच्या काळामध्ये सम्राट अशोक हे तक्षशिला आणि त्यानंतर उज्जैनी या ठिकाणी राज्यपाल पदावरती होते. म्हणजे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे होते.

 

सम्राट अशोक यांचे शिक्षण

सम्राट हे उच्च शिक्षित होते. त्या काळातील प्रथा, परंपरेला, धरून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं. वैद्यकीय शिक्षण, आरोग्याच्या संदर्भातले शिक्षण, कलेच्या क्षेत्रातील शिक्षण, युद्ध कलेचे शिक्षण, अनेक भाषा आणि तत्त्वज्ञान या संदर्भातलं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्या प्रथा परंपरेनुसार तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, अजीवक संप्रदाय आणि ब्राह्मण संप्रदाय यांचा प्रभाव जन माणसावरती होता.

 

सम्राट अशोक यांचे कुटुंब

अशोक चन्द्रगुप्त मौर्य याचा वंशज होता. बिंदुसार हे महान सम्राट अशोकाचे वडील होते. अशोक यांच्या आईचे नाव शुभाद्रंगी होते.

 

सम्राट अशोक यांची पत्नी

चक्रवर्ती अशोक यांच्या ४ पत्नियां होत्या. त्यांची नावे देवी , कारुवाकी, पद्मावती, तिष्यरक्षिता अशी होती.

सम्राट अशोक यांची अपत्ये

चक्रवर्ती अशोक यांना 4 पुत्र होते. त्यांचे महेंद्र , संघमित्रा, तीवल, कनल, आणि एक पुत्र चारुमती अशी नावे होती.

सम्राट अशोक यांचा धार्मिक परिचय

बिंदुसराच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला इसवी सन पूर्व २६८ साली सम्राट यांनी राज्याभिषेक करून घेतला. सम्राट अशोक यांनी देवांचा प्रियदर्शी असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेख व स्तंभलेखांतून केलेला आहे.

राजवटीच्या प्रारंभी सम्राट अशोकाचे धोरण पूर्वजांप्रमाणे, दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते. त्याने कलिंगवर आक्रमण केले आणि जिंकून घेतले. अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळी वळण लावणारा ठरला. या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली.

 

अशोकाचा विजय झाला. कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने, त्याच्या मनात परिवर्तन घडवून आणले. अहिंसा प्रधान, शांतिवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेदले गेले. म्हणजे धर्म विजयाने घेतली. त्यांनी जगासमोर ठेवलेल्या धार्मिक आदर्श मुळे आणि तो व्यवहारात उतरवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेमुळेच, त्याची कारकीर्द महत्त्वाची ठरली.

धम्मविजयाच्या अंमलबजावणीसाठी, अशोकाने काही नव्या गोष्टींचा अवलंब केला. उदाहरणार्थ धर्म महामात्रांची नेमणूक, मद्यपान बंदी, नैतिक आचरणासंबंधीचे आदेश, इत्यादी. नैतिक तत्त्वांचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचार संपन्न व्यवहार म्हणजे, अशोकाचा धम्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी संघ बनवले आणि त्यांना देशोदेशी रवाना केले.

भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर, राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरली होती. कालाशुक राजाने वैशाली येथे दुसरी परिषद भरवली. अशोकाने बौद्ध धर्माची तिसरी परिषद राजधानी पाटलीपुत्र येथे भरवली.

 

सम्राट अशोक यांचे कलिंगाचे युद्ध

कलिंग हे प्रबळ राज्य होते. बाह्य जगाशी व्यवसाय वाढवण्यासाठी अशोकाला, समुद्रकिनाऱ्यावर सत्ता हवी होती. आणि ती सत्ता कलिंगाकडे होती. तसेच कलिंग हा समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, अशोकाने साधारणपणे इसवी सन पूर्व २६५ सुमारास युद्ध केले.

अशोक हा राजा झाल्यानंतर, आठ वर्षानंतर कलिंगाचे युद्ध झाले. हे भयंकर युद्ध होते. अशोकाने कलिंगाचे युद्ध पार पाडल्यानंतर, जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पाहणी करायची ठरवली, पाहणी करताना त्याने फक्त सर्वत्र पसरलेली प्रेतांची दुर्गंधी, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली.

ते पाहून अशोकाचे मन उदास झाले आणि यासाठीच, का मी हे युद्ध जिंकले ? हा विजय नाहीतर, पराजय आहे. असे म्हणून, त्याने स्वतःलाच प्रचंड विनाशाचे कारण मानले. या युद्धात एक लाख सैनिक व अनेक लोक मारले गेले.

तसेच मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाले. हे सर्व बघून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले. हिंसक राजाचे रूपांतर शांतता प्रिय राज्यात झाले. त्याने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिलालेख व स्तंभालेख इत्यादीचा वापर केला.

 

सम्राट अशोक मौर्य यांचे शिलालेख

विजयामुळे प्रेम भावना वाढते, तोच खरा विजय. असे संदेश त्याने शिलालेख व स्तंभालेखांवरून कोरले होते. हे सर्व लेख ब्राह्मणी लिपीत आहेत. या सर्व लेखांमध्ये अशोकाने स्वतःचा उल्लेख देवानंद असा केलेला आहे. याचा अर्थ देवाचे प्रियदर्शी असा होतो.

सम्राट अशोकाने एकूण ३३ शिलालेख कोरले होते. हे शिलालेख दगड, डोंगर व गुहांच्या भिंतीत त्यांच्या कार्यात कोरले गेले होते. हे शिलालेख आजच्या भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तान या देशात आहेत.

अफगाणिस्तान, नेपाळ आणि भारत या प्रदेशांमध्ये सगळीकडे अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख विखुरलेले आहेत. सम्राट अशोकाचा मिरत मध्ये असलेला स्तंभलेख इसवीसन १७५० मध्ये लर्न यांनी शोधून काढला.

अशोकाचे बहुतांशी लेख ब्राह्मणी लिपीत कोरलेले आहेत. इसवी सन १८३७ साली जेम्स प्रिन्सेस याने शिलालेखातील ब्राम्ही लिपीचे वाचन केले. अशोकाचे शिलालेख, अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची साधने आहेत. त्याच्या आधारे मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते.

बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीची वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म शक्तीने लादण्याचा प्रयत्न अशोकाने केला नाही. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी, अशोकाने बौद्ध भिक्खूंना पाठवण्याचा लेखी प्रवास या शिलालेखातून मिळतो.

त्यामध्ये अशोकाचा पुत्र महिंद म्हणजे महिंद्र आणि कन्या संघमित्ता म्हणजे संघमित्रा यांचा समावेश होता. महाराष्ट्र बाबतीत विचार केला तर, आपल्या महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याचा विस्तार इसवी सनापूर्वी ३२१ ते १८१ या काळात झाला. सोपारा हे प्राचीन प्रसिद्ध बंदर, उत्तर कोकणात आहे. सोपारा आणि चौल म्हणजे चंपावती ही भरभराटीला आलेली व्यापारी केंद्रे आणि बौद्ध धर्माची अभ्यास पीठे होती.

भगवानलाल इंद्रजींनी गरुडा राजाचा कोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोपार्याच्या स्तूपाचे उत्खनन केले. या उत्खलनात अशोकाच्या लेखाचा एक तुटलेला भाग मिळाला. चक्रवर्ती अशोकच्या १४ स्तंभलेखांपैकी तो आठवा स्तंभलेख होता.

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या वस्तू संग्रहालयात यांतील काही अवशेष ठेवले आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे

त्यांनी कलिंगावर केलेली स्वारी व त्याचे झालेले परिवर्तन, याची माहिती एका शिलालेखात आढळते. चक्रवर्ती अशोकच्या दिल्ली चोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकड, गेंडे, इत्यादींची शिकार करू नये. जंगलात वनवे लावू नये, अशी सक्त ताकीद होती. यावरून सम्राट अशोकाचे वन्य प्राण्यांविषयीचे प्रेम व पर्यावरण विषयी जागरूकता दिसून येते.

 

शिलालेख ठिकाण
जौगढ गंजम जिल्हा, ओरिसा
गुजरा दतिया जिल्हा, मध्य प्रदेश
कस्तुरी रायचूर जिल्हा, कर्नाटक
रूपनाथ जबलपूर जिल्हा, मध्य प्रदेश
येर्रागुडी कुर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश
गढीमठ रायचूर जिल्हा, कर्नाटक
अहराउरा मिर्झापूर जिल्हा, उत्तर प्रदेश
बॅराट राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील कलकत्ता संग्रहालय
राजुलमंडगिरी बल्लारी जिल्हा, कर्नाटक
ब्रह्मगिरी चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक
सिद्धपूर चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक
दिल्ली अमर कॉलनी, दिल्ली
सहस्राम शहााबाद जिल्हा, बिहार
धौली पुरी जिल्हा, ओरिसा
जातिंगा रामेश्वर चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक

 

सम्राट अशोक यांनी केलेले बांधकाम

चक्रवर्ती अशोकने तत्कालीन संपूर्ण भारतावर राज्य करून, एक महान राजा म्हणून ओळख प्राप्त केली. चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट यांचे आजोबा, चंद्रगुप्त मौर्य यांच्याप्रमाणे सम्राट अशोक हे बौद्ध धर्मानंतर, जैन धर्माचे विचारवंत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकारकिर्दीमध्ये अनेक स्तूप, मठ, इमारती, स्तंभ, इत्यादींचे बांधकाम केले. राजस्थान मधील बैरथ या ठिकाणी सम्राट यांनी बांधलेले मठ व स्तूप आढळतात. यासोबतच अशोक यांनी बांधलेली स्तूप प्रचंड प्रसिद्ध आहे.

 

सम्राट अशोक महान व शक्तिशाली राजा म्हणून ओळख

चक्रवर्ती अशोक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू आणि बिंदुसार यांचा मुलगा होता. बिंदूसरांच्या निधनानंतर अशोकाचा राज्याभिषेक झाला. अशोक अत्यंत शूर होता. त्यांनी आपले राज्य खूप मोठे बनवले. भारताच्या इतिहासात सम्राट यांना महान व शक्तिशाली राजा म्हणून स्थान दिले आहे. त्यांना चक्रवर्ती सम्राट असे म्हटले जाते. म्हणजेच सम्राटांचा सम्राट आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत. कलिंगच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर त्यांनी कलिंग राज्य मिळवले जे कोणत्याच मौर्य राज्यकर्त्याला जमले नाही. त्या युद्धात दोन्ही बाजूच्या सैन्यांची प्रचंड हानी झाली होती. त्यांच्या तेराव्या शिलालेखात याचा उल्लेख आहे.

 

सम्राट अशोक यांचा बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार

कलिंग देशा बरोबरील युद्धात एक लाख सैनिक मारले गेले. दीड लाख जखमी झाले आणि त्याहून अधिक बेपत्ता झाले. या नरसहाराला बघून सम्राटाचे हृदय परिवर्तन झाले हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःलाही विनाशाचे कारण मानले. या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया, ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्म स्वीकारायचे अशोकाने ठरवले. नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार केला.

 

सम्राट अशोकाचे साम्राज्य

सम्राट यांनी अनेक शिलालेख आणि स्तंभलेख लिहिले. तसेच अनेक स्तूपही बांधले. अशोक हे कर्तृत्ववान राजा होते. अफगाणिस्तान पासून, बंगालच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशावर सार्वभौमत्व स्थापन करणारा सम्राट अशोक भारतीय इतिहासातील एकमेव योद्धा होता. त्यामुळे चक्रवर्ती अशोक यांना सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती सम्राट मानले जाते.

 

अशोक विजयादशमी

  • सम्राट अशोकाला चंद्र अशोक असे म्हणून ओळखले जात होते. कारण सम्राट अशोकाचा स्वभाव अत्यंत युद्धखोर असा होता. चंद्र अशोकच्या राज्याभिषेकानंतर, आठ वर्षांनी म्हणजे इसवीसन पूर्व २६१ मध्ये कलिंग युद्ध लढले गेले. हे कलिंगचे युद्ध भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे युद्ध आहे.
  • इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात, अखंड भारताचा जास्तीत जास्त भाग हा मौर्यांच्या अधिपत्याखाली असूनही, कलिंग हे एक स्वतंत्र राज्य होते. हे कलिंग राज्य मिळवण्यासाठी, कलिंगवर स्वारी केली, आणि या युद्धात जवळपास एक लाखापेक्षा जास्त सैनिक व नागरिक मारले गेले.
  • हे युद्ध चंद्र अशोक जिंकला. परंतु, या मिळालेल्या विजयाने तो युद्धातील जीवितहानी बघून त्यातून त्याला खूपच पश्चाताप झाला. त्यामुळे सम्राट अशोल यांनी पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्धार केला.
  • बुद्धाच्या अहिंसेच्या शिकवणीने तो प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ज्या दिवशी चंद्र अशोकने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या दिवसाला अशोक विजयादशमी असेही म्हणतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *